⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

UPSC सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम हा एकमेव मार्ग – पोलीस अधीक्षक कुमार चिंता

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । आजकाल मुलं खूप सक्रिय झाली आहेत आणि त्यांच्या भविष्याबद्दल जागरुक झाली आहेत. यामुळंच कि काय अनेक मुलं स्पर्धा परीक्षांबद्दलही विचार करत आहेत. पण विचार करूनही अनेक वेळा मुलांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळत नाही, त्यामुळे ते ध्येय गाठू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल व्हावे व त्यांना रस्ता दाखवावा या उद्देशाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे जळगाव येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.


एसपी ऑफिसच्या मागे असलेल्या पोलिसांच्या मंगलम हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश विनामूल्य होता आणि विशेषत: पोलिसांच्या कुटुंबातील मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.UPSC MPSC सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हा कार्यक्रम एका वृत्तवाहिनी तर्फे आयोजित करण्यात आला होता. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन जकी अहमद यांनी केले.