⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्हा परिषदेतील निम्मे‎ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे‎

जिल्हा परिषदेतील निम्मे‎ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढतीच असून कोरोनाचा जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत‎ शिरकाव झाला आहे.‎ दाेन विभागप्रमुखांसह २० पेक्षा‎ अधिक कर्मचाऱ्यांचे काेराेना‎ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.‎ आणखी तीन अधिकारी, निम्मेपेक्षा‎ जास्त कर्मचाऱ्यांना काेराेनाची‎ लक्षणे आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून बधिताचा आकडा ४००शेच्या वर आढळून येत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे मात्र मृत्यची नोंद नसल्याने दिलासा मिळत आहे. जिल्हा परिषद नवीन‎ इमारतीत तळमजल्यावर आराेग्य‎ विभाग आणि महिला व‎ बालविकास विभागात काेराेना‎ संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या‎ वाढली आहे.‎ पहिल्या मजल्यावरील‎ ग्रामपंचायत विभागातही काेराेनाचे‎ रूग्ण असल्याने या कार्यालयातील‎ कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण‎ आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी‎ अधिकाऱ्यांसह दाेन कार्यकारी‎ अभियंत्यांना काेराेनाची लक्षणे‎ आहेत. त्यांचे काेराेना तपासणीचे‎ अहवाल प्राप्त झालेले नाहीत.‎ दरम्यान, लक्षणे असलेल्या‎ कर्मचाऱ्यांना काेराेना चाचणी करून‎ घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी‎ अधिकारी डाॅ. पंकज आशिया‎ यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.‎ नागरिकांनीदेखील अतिमहत्त्वाच्या‎ कामाशिवाय जिल्हा परिषद‎ कार्यालयात येणे टाळावे, असे‎ आवाहन प्रशासनातर्फे करण्यात‎ आले आहे.‎

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.