---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात पुन्हा लाखो रुपयांचा गुटखा पकडला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । मुक्ताईनगरात पुन्हा एकदा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणार्‍या वाहनातून सुमारे 18 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

gutkha jpg webp webp

मागील काही काळापासून मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्यामुळे मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत आले. यापूर्वी अनेकदा गुटख्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करून लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

---Advertisement---

अशातच नाशिक येथील गुप्तचर खात्याला अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार नाशिक येथील गुप्तचर खात्याने सापळा रचून आज बुधवारी सकाळ मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टजवळ MH19 BA 2384 या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला.

त्यात 18 लाख रूपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून एकूण 22 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---