जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२४ । अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन केलं. मात्र यावेळी आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर देखील फाडलं गेलं. यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून राज्यभरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले जात आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रकार हा वाईट आहे. अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे हे ज्या माणसाला कळत नाही हा मनोविकृत माणूस आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, असा टीका त्यांनी यावेळी केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही गुलाबराव पाटलांनी केली आहे.