एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते, पण.. पालकमंत्री गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या एका कार्यक्रमात, पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. उपमुख्यमंत्रिपदाबद्दल बोलताना ते दिसले. यासोबतच त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
गुलाबराव पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना समजून सांगितले की आपण सत्तेत असले पाहिजे कारण हे सरकार येण्यामध्ये एकनाथ शिंदे नावाची खूप मोठी ताकद होती.” त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारच्या संदर्भात देखील बोलले, “देवेंद्र भाऊ यांनी सुद्धा मोठे मन दाखवले होते, त्यामुळे आता त्यांच्या सरकारमध्ये आपण सुद्धा मोठेपण दाखवला पाहिजे.”
गुलाबराव पाटील यांनी आणखी सांगितले की, “एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व आमदारांचा मान ठेवला आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मंत्री आणि पालकमंत्री पदासाठी तीन जणांचे सरकार असल्यामुळे काही अडचणी सरकारला आल्या.” त्यांनी नमूद केले की अनेक जिल्ह्यांमध्ये सीनियर आमदार होते जे तीन वेळा आमदार होते, आणि जवळपास 40 आमदार असे आहेत जे तीन वेळा निवडून आले.
मंत्री पदासाठी लॉबिंग करण्याबद्दल बोलताना, गुलाबराव पाटील म्हणाले, “मी कुठेही गेलो नाही कारण ज्या माणसाला पद द्यायचे असते त्या माणसाला किती अडचणी असतात ते आपल्याला माहित आहे. असे असतानाही तिसऱ्या वेळेस मंत्री पदाची संधी मला मिळाली.” त्यांनी उदाहरण देताना सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये, आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना पाणीपुरवठा खाते मिळाले आहे.
या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली आणि काही मोठे खुलासे देखील केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.