⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

रोज मरे त्याला कोण रडे.. ईडीच्या कारवायांवर गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav)आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. या छापेमारीवर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्‍या कारवाया रोज पहायला व ऐकायला मिळत आहेत. रोज टीव्‍हीवर बातमी पहायला मिळत आहे. एलसीबीसारखी आता ईडी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ईडीने (ED) केली आहे. जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या, तसेच ईडीचा गैरप्रकार केला जात आहे. अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सूचक इशारा दिला आहे. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. महाराष्ट्राला सहन करावं लागेल. पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावं लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तसेच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही छापेमारी सुरू झाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.

हे देखील वाचा :