जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । एकीकडे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधी नेते हल्लाबोल करीत असताना धरणगाव येथील चर्मकार समाजाच्या मेळाव्यात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकार विरोधात खळबळजनक उद्गार काढलं आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचा धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणाले..
आम्ही सत्तेत आल्यापासून लोक विस्कळीत आहेत आणि देव पण… असं खळबळजनक गुलाबराव पाटलांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता हा अवेळी पडणारा पाऊसामुळे आम्ही तर हे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्यावरही भाष्य केलं. पक्ष जे सांगेल तेच नेता करत असतो, तेच काम शरद पवारांनी केलंय. शेवटी ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीतल्या घडामोडी ही शेवटी त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्यांच्या पक्षाला जे वाटलं ते त्यांच्या कोअर कमिटीने केलं. त्याचं स्वागत शरद पवारांनी केलंय. शेवटी नेता हा पक्ष आणि कार्यकर्त्यांना बांधील असतो. तो असलाच पाहिजे. तेच शरद पवार यांनी केलं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
दोन गुलाबराव एकाच मंचावर ; अनेकांच्या भुवया उंचावल्या
चर्मकार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने एकाच व्यासपीठावर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे एकत्र दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ आणि शिंदे गटाचे मंत्री हे एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.