शनिवार, डिसेंबर 2, 2023

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात बिजनेस मॉडल कॅनव्हासवर मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आय.आय.सी व आय.क्यू.ए.सी. यांच्या माध्यमातून बिझनेस मॉडेल कॅनव्हास या विषयावर बेसिक सायन्सेस अ‍ॅण्ड हुम्यानिटीज या विभागातर्फे सोमवार दि२ जून रोजी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती?
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉ.प्रशांत वारके (संचालक, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च) हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटीज), प्रा. अतुल बर्‍हाटे (आय.आय.सी. कन्व्हेनर), प्रा. तुषार कोळी (आय.क्यू.ए.सी.), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर डॉ. प्रशांत वारके यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यवसायाचा आराखडा काय असतो याबद्दल विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती दिली. व्यवस्थापन हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याचे विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठीच व्यवसायाचा आराखडा तयार करून व्यवसायाच्या भविष्याचे चित्र आधीपासूनच तयार केले जाते. व्यवसायातील ध्येय ठरवून निरनिराळ्या पातळींवर त्याचा आराखडा तयार केला की यश मिळण्याची शक्यता खूपच वाढते.

तीन महत्त्वाचे मुद्दे तुमच्या आराखड़यात असणे आवश्यकच आहे. तुम्ही कोण आहात? तुम्हाला या क्षेत्रात नेमके काय करायचे आहे व तुम्ही स्वत: व कंपनीचे पाय घट्ट रोवून किती काळ उभे राहू शकता यावर विचार करायला हवा. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे ग्राहक कोण असणार, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करा. तुमच्या ध्येयावर ठाम राहा. तुमचे उत्पन्न व वृद्धी यांची विस्तृत माहिती द्या. तुमची विक्री, उत्पन्न आणि नफा-तोटा यासाठी कोण जबाबदार असेल याचा विचार करा. या सर्व गोष्टी सांगत असताना त्यांनी या संबंधित समर्पक अशी उदाहरणे देताना विद्यार्थ्यांना बोलते केले. तसेच रिसेंट टेक्नॉलॉजी वर अवलंबून असणारे व्यापार किंवा व्यवसाय कसे करता येतील याचे काही प्रात्यक्षिकही सांगितले.

विद्यार्थ्यांनी सदर प्रोग्रामला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्षाच्या प्रा. ललिता पाटील यांनी डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अक्षता भोळे तसेच आभार प्रदर्शन सेजल सातव हिने केले.