जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे अभिवादन करण्यात आले.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी आदींसह इतर उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






