जळगाव शहर

जळगावात अभिनेत्री शिवाली परबच्या विशेष उपस्थितीत १९ रोजी रंगणार ‘भव्य दांडिया नाईट’

१०६.४ एफएम व पाटील बायोटेकचे आयोजन; कंटेंट ओशन इन्फोटेकची डिजिटल पार्टनरशिप

जळगाव लाईव्ह न्यूज । नवरात्रोत्सवाच्या आनंदाला आणि उत्साहाला संगीताची व नृत्याची भव्य मेजवानी जोडण्यासाठी जळगावकरांसाठी एका शानदार ‘दांडिया नाईट’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता यश लॉन्स, जळगाव येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. लोकप्रिय टीव्ही शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.

१०६.४ एफएम आणि पाटील बायोटेक यांच्या संयुक्त प्रस्तुतीने होणाऱ्या या कार्यक्रमात ढोल-ताशांच्या तालावर, अस्सल गरबा आणि दांडियावर थिरकण्याची सुवर्णसंधी जळगावकरांना मिळणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर म्हणून कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा. लि. ही कंपनी काम पाहत असून, डिजिटल माध्यमातून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

पारंपरिक दांडिया आणि आधुनिक संगीताचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जळगावकरांनी आपल्या कुटुंबिय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका ‘बुक माय शो’ वर उपलब्ध असून, रसिकांनी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर आपली तिकिटे बूक करावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button