⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | राष्ट्रीय | तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर सावधान..; SBI खातेधारकांना सरकारचा सतर्कतेचा इशारा

तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर सावधान..; SBI खातेधारकांना सरकारचा सतर्कतेचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान , तुमचं बँक खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सरकारने SBI च्या करोडो खातेदारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरं तर, एसबीआयच्या करोडो खातेधारकांना फसवणुकीचा धोका आहे. लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या खात्यातून बनावट मेसेजद्वारे पैसे काढले जात आहेत. याबाबत सरकारने इशारा दिला आहे.

सरकारी बँक एसबीआयच्या करोडो खातेदारांना फसवणुकीचा धोका आहे, त्या संदर्भात सरकारने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. सरकारने जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये एसबीआयच्या नावाने येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहावे, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होत आहे. लोकांना ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंट्सचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरत असलेल्या फसवणुकीच्या मेसेजद्वारे सायबर फसवणुकीला बळी पडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तुमचे SBI मध्ये बँक खाते असेल तर या मेसेजपासून दूर राहा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने फिरत आहे. ज्यामध्ये SBI नेटबँकिंग रिवॉर्ड पॉइंट 9980 रुपये असल्याचे सांगितले आहे. संदेशात, लोकांना हा रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी APK फाइल अपलोड करण्यास सांगितले जात आहे. हे संदेश एसएमएस, ईमेल, व्हॉट्सॲपद्वारे लोकांना पाठवले जात आहेत. कृपया लक्षात घ्या की हे संदेश बनावट आहेत. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज बनावट असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

एसबीआयने असेही म्हटले आहे की ते कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही. लोकांना बँक आणि सरकारकडून एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस इत्यादीसाठी SBI अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.