⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खाद्यतेलाच्या दरात ३० रुपयांनी कपात, ग्राहकांना लाभ देण्याचे सरकारचे कंपन्यांना सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । आज वर्ष २०२१ चा शेवटचा दिवशी आहे. परंतु नवीन वर्षाच्या आधीचवाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मागील काही महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहे. या किमती कमी करण्यासाठी सरकार अनेक पाऊल उचलत आहे. अशात सरकारने खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयाची मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर सरकारने कंपन्यांशी चर्चा केली आहे. सरकारने कमी केलेल्या किमतींचा संपूर्ण लाभ ग्राहकांना मिळावा, अशा स्पष्ट सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयांनी कपात
खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव डॉ. सुधांशू पांडे यांनी राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांमध्ये एमआरपीवर तेलाची विक्री सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रभावी पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आयात शुल्क जवळपास शून्य
पांडे म्हणाले की, स्वयंपाकाच्या तेलाचे आयात शुल्क जवळपास शून्यावर आणले आहे. आयात शुल्कात बदल केल्यानंतर तेलाच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व ब्रँडच्या तेलाच्या किमतीत 30 ते 40 रुपयांची घट झाली आहे.

दरकपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळेल
सरकारने कंपन्यांना किमतीतील कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच तेलाच्या पाकिटांवर किंवा बाटल्यांवर किंवा कोणत्याही कंटेनरवर सुधारित एमआरपी छापण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. खाद्य तेलाच्या किमती आणखी कमी होतील, असे अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव डॉ. सुधांशू पांडे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :