अहो.. खरंच LPG सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले आहेत? सरकारने दिले अधिकृत स्पष्टीकरण

मार्च 25, 2026 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अनेक माध्यमांमध्ये असा दावा करणारे वृत्त पसरू लागले की, केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ३५ दिवसांपर्यंत वाढवला आहे. या वृत्तांनुसार, सरकारने एलपीजी रिफिल बुकिंगची मुदत सुधारित केली होती. या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत कनेक्शन असलेल्यांसाठी बुकिंगची मुदत ४५ दिवसांपर्यंत, PMUY अंतर्गत नसलेल्या सिंगल-सिलेंडर कनेक्शनसाठी २५ दिवसांपर्यंत आणि PMUY अंतर्गत नसलेल्या डबल-सिलेंडर कनेक्शनसाठी ३५ दिवसांपर्यंत वाढवण्यात येणार होती.

gas jpg webp

मात्र, सरकारने आता ही वृत्ते फेटाळून लावली आहेत. सरकारने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगच्या वेळेसंदर्भात बुकिंगला ३५ दिवसांचा विलंब होत असल्याची वृत्ते समोर आली आहेत. सरकारने स्पष्ट केले की, असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. तेच नियम लागू राहतील. शहरी भागात २५ दिवसांच्या आत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या आत एलपीजी रिफिल बुक करता येईल.

सध्याचे नियम काय आहेत?
शहरी भागात: २५ दिवसांनंतर एलपीजी रिफिल बुकिंग
ग्रामीण भागात: ४५ दिवसांनंतर एलपीजी रिफिल बुकिंग

पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी हे नियम लागू केले आहेत. सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका. तसेच, गरज नसताना किंवा घाबरून एलपीजी रिफिल बुक करणे टाळा. सरकारने पुन्हा एकदा सांगितले आहे की, देशात एलपीजीचा पुरेसा साठा आहे आणि पुरवठ्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही
दुसरीकडे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) आपल्या अधिकृत खात्यावर एक संदेश प्रसिद्ध केला आहे, ज्यात म्हटले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे वृत्त निराधार आहे. देशात पुरेसा तेलसाठा असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सामान्य आहे. बीपीसीएलचा पुरवठा पूर्णपणे कार्यरत असून, अखंड इंधन पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. बीपीसीएल सर्वांना कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now