जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । समता नगरात सर्व रोगनिदान शिवीर आयोजित करण्यात आले होते. रोगनिदान शिवीर हे शासकीय आयुर्वेद रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे तर शिवीराचे सर्व आयोजन हे आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जनकल्याण युवा फाउंडेशन आणि शिवशक्ती मानव सेवा संस्थान यांनी केले होते.
त्यात मधुमेह, दमा, खोकला, पँरलिसिस,मूळव्याध, मणक्याचे आजार इ. आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली आणि सर्वांना मोफत औषधी देखील देण्यात आल्या. त्यात शासकीय आयुर्वेद रुग्णालय येथील वैद्या शर्मिली सूर्यवंशी, वैद्या स्वाती गायकवाड, वैद्य राजीव टारपे, वैद्य विनायक पाचे, वैदही जोशी आणि सीमा साखरे परिचारिका, हर्षली तायडे आणि धिरज राठोड फार्मासिस्ट, तसेच किसन पावरा लॅब टेक्निशियन उपस्थित होते.
त्यावेळी विकी कलाल, मुकेश शिंदे, मनोज सोनार, बाळा सोनार, किशोर जाधव, गौरव लक्ष्मण सोनवणे आदी. यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
- दोघांचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन, उच्च न्यायालयाने प्रकरण CBI व NIA कडे सोपविले
- स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार
- जैन इरिगेशनला मिळाले सोलापूरच्या लाल डाळिंब निर्मितीचे अधिकार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राशी सामंजस्य करार
- अमळनेरमध्ये पालिकेतर्फे माेठ्या गटारींचीही केली जातेय स्वच्छता
- जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात भीषण पाणी टंचाई : अंजनी प्रकल्पातून पाणी मिळण्याची आशा
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज