⁠ 
सोमवार, मे 27, 2024

ऐनपूरच्या शेतकऱ्याला लावला २३ लाखांचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । पॉलिसीवर आर्थिक फायदा झाल्याचे बनावट धनादेशद्वारे दाखवीत शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सन २०१० ते २०२४ पर्यंत वेळोवेळी शेतकऱ्याकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून त्यांची २३ लाख ४७ हजारात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे संजय त्र्यंबक कुलकर्णी (वय ७१) हे वृद्ध वास्तव्यास असून ते शेती करतात. त्यांच्यासोबत विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून त्यांनी काढलेल्या पॉलिसींवर आर्थिक फायदा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

तसेच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ते धनादेश पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे सन २०१० ते २०२४ पर्यंत चौदा वर्षांत संजय कुलकर्णी यांना आर्थिक फायदा होत असल्याचे भासवून त्यांच्याकडून वेळोवळी बँक खात्यावर तब्बल २३ लाख ४७ हजार ऑनलाइन पैसे स्वीकारले. कुलकर्णी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.