Sunday, December 4, 2022

फौजेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर : राजनाथ सिंह यांनी केली ‘ही’ घोषणा

- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे.चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे.

याबाबद माहिती अशी कि , प्रत्येकाची इच्छा असते कि आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं. आपण आपल शौर्य सीमेवर दाखवावं. मात्र सगळ्यांनाच हि संधी मिळते अशी नाही. मात्र तरुण भारतीय मुलांना आता हीच संधी मिळणार आहे. या अंतर्गत आता भारताच्या तिन्ही सैन्यात ४ वर्षासाठी तरुणांची हि भरती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे.

- Advertisement -

‘टूर ऑफ ड्यूटी’ असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती. लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे. “सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]