एरंडोल येथील पोस्ट खात्याचा गलथान कारभार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । एरंडोल येथील पोस्ट खात्याच्या गलथान कारभारा बद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी असुन येथील पोस्ट कार्याविषयी अनेक तक्रारी येत असून नागरिक त्यामुळे त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

एरंडोल येथे येथील हायवेलगत असलेल्या पोस्ट कार्यालयात गलथान कारभार सुरू आहे. या कार्यालयातील बहुतेक कर्मचारी अपडाऊन करणारे आहे. त्यामुळे बाहेरगावाहून ऑफिस टाईम मध्ये वेळेवर पोहोचत नाही.या कार्यात शासनाच्या विविध योजनेतून गरीब होतकरू नागरिकांना आर्थिक मदत शासनातर्फे केली जाते.

संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अपंग विधवा परित्यक्ता महिला यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते.ती मदत पोस्टकार्ड खात्यामार्फत संबंधितांना दिले जाते.ही मदत घेण्यासाठी महिला पुरुष पोस्ट ऑफिस मध्ये येतात. आपले आर्थिक मदत शास्त्राकडे आली आहे काय ? हे विचारण्यासाठी संबंधित पुरुष महिला कार्यालयात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

कॉम्प्युटर बंद आहे,उद्या या,परवा या, असे सांगितले जाते. शासनाकडून पैसे आलेले असताना सुद्धा संबंधितांना तीन-चार वेळेस काही वृद्ध पुरुष महिला या त्यांचे त्यांचेकडून चालवले जात नाही.म्हणून भाड्याच्या रिक्षा कडून पोस्ट कार्यालयात असे आशेने येतात परंतु चिरीमिरी च्या अपेक्षेने संबंधितांना वेगवेगळी कारणे सांगून पगारापासून वंचित ठेवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. 

या कार्यालयात सर्वेअर बंद आहे असे नियमित सांगितले जाते व पैसे काढणारा सुद्धा त्रास दिला जातो.या कार्यालयात अनेकांना उद्धट वागणूक दिली जाते.ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पैशांसाठी तासनतास उभे राहावे लागते. आरडी पूर्ण झालेल्या खातेदारांना सुद्धा पैसे देण्यास टाळाटाळ करतात. पैसे काढणार यांना आधार कार्ड ओळख कार्ड मागितले जाते.वास्तविक खाते उघडतानाच फोटो ओळख  दिल्याशिवाय खाते उघडले जात नाही.प्रत्यक्ष खातेदार पैसे काढण्यासाठी आल्यावर असतानासुद्धा आधार कार्ड शिवाय पैसे दिले जात नाही.स्लीप भरतांना किरकोळ चुका झाल्यावर पुन्हा पुन्हा नवीन स्लीप भरून द्यावी लागते.

या कार्यालयातील सर्वेर नेहमीच बंद दाखविले जाते.त्यामुळे पैशांचा व्यवहार करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.काही तांत्रिक बिघाडामुळे थोडेफार प्रॉब्लेम आल्यावर सुद्धा दिवसभर सर्वर बंद असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोस्ट खात्यात व्यवहार करणाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बसला आहे तरी या संपूर्ण बाबींबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी होत आहे