जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२६ । सोमवारपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज, शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकांना आणि लग्नबंधनात अडकणाऱ्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘Goodreturns’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ४४० रुपयांनी घसरले आहेत. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मात्र कोणतीही हालचाल झाली नसून दर स्थिर आहेत.या घसरणीमुळे २४ कॅरेट सोने ₹१,५९,४९० रुपये प्रति तोळा इतक्यावर पोहोचला तर तर एक किलो चांदीचा दर २,८५,००० रुपये इतका आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोन्याचे आलेख सातत्याने वर जात होते. मात्र, वीकेंडच्या ऐन तोंडावर आज शुक्रवारी झालेली ही ४४० रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. सराफा तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. आगामी काळात सोन्या-चांदीचे दर कोणत्या दिशेने जातात, याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.










