Gold Rate : सोने दरात पुन्हा वाढ.. आता 22 आणि 24 कॅरेट खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

ऑगस्ट 4, 2025 4:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. मागच्या काही दिवसात सोने दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत आहे. श्रावण महिना सुरु झाला असून त्यात रक्षाबंधन सारखा सण आता अवघ्या काही दिवसावर आला असून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. मात्र आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि रक्षाबंधनपूर्वीच सोने दरात वाढ दिसून आली. आज सोन्याचे दर प्रति तोळा ५० रुपयांनी वाढले आहेत.

gold silver 2 jpg webp

काय आहे आजचा सोने भाव?

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,४०० रुपये आहेत. या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,१२० रुपये आहेत. तर १० तोळे सोन्याचे दर १०,१४,००० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर ९२,९५० रुपये झाले आहेत. या दरातदेखील ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,३६० रुपये आहेत तर १० तोळा सोने ९,२९,५०० रुपयांवर विकले जात आहेत. दुसरीकडे चांदी दर आज स्थिर दिसून आला. चांदीचा दर १,१३,००० रुपयांवर स्थिरावला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now