जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । एकीकडे रक्षाबंधनाचा पवित्र सण जवळ येत असताना, पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. देशभरात सोन्याचे दर एक लाखाच्यावर गेल्याने खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांच्या हाताबाहेर गेले आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केल्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आज सोने दरात घसरण दिसून आलीय. सोबतच चांदीही घसरण झाली आहे.

सोन्याचा दर । Gold Rate
goodreturns नुसार आज ३१ जुलै रोजी २४ कॅरेट सोने दरात प्रति तोळा ४५० रुपयांनी घसरून १०००३० रुपयावर पोहोचले आहे. यापूर्वी काल सोन्याचा दर १००४८० रुपयांवर बंद झाला होता. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांनी घसरून ९१,७०० रुपयावर पोहोचला आहे.८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,०२४ रुपये आहेत. या दरात ३६० रुपयांनी घसरण झाली आहे.

चांदीचा दर | Silver Rate
दुसरीकडे चांदीचा दर आज तब्बल २००० रुपयांनी घसरला आहे. यामुळे सध्या चांदीचा एक किलोचा दर ११५००० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी बुधवारी चांदीचा दर ११७००० रुपयांवर बंद झाला होता.
रक्षाबंधन, नारळीपोर्णिमेला अनेक जण सोने चांदी भेटवस्तू देतात. मात्र मागच्या काही दिवसात सोने चांदीचे दर गगनाला भिडले आहे. आज सोने आणि चांदीचा दर घसरला असला तरी सोन्याचा भाव एक लाखाच्या वर असल्याने खरेदी करणे सर्वसामान्यान ग्राहकांच्या हाताबाहेर गेले आहे.












