ग्राहकांना दिलासा! 2 दिवसात सोने 4738 तर चांदी 8280 रुपयांनी स्वस्त; जळगावात आता भाव काय?

ऑक्टोबर 29, 2025 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील सुवर्णनगरीत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन त्यांनी नवनवीन उच्चांक गाठला. मात्र आता गेल्या आठवड्यापासून चांदीत मोठी घसरण होण्यासह सोन्याचेही भाव कमी-कमी होत आहे. यातच चालू आठवड्याच्या दोन दिवसात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

gold silver 1 jpg webp

जळगाव सराफ बाजारात सोमवारी (दि २७ ऑक्टोबर) सोने-चांदीच्या दरात सुरु झालेली घसरणीला मंगळवारी अधिक वेग आला. मंगळवारी सोने ३८११ रुपयांनी तर चांदी ५१५० रुपयांनी घसरली. दोन दिवसात सोने प्रती तोळ्यामागे ४७३८ रुपयांनी तर चांदी ८२४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोमवारी १२६१७५ रुपये तोळा असलेले सोन्याचे दर ३८११ रुपयांनी खाली येऊन १२२३६४ रुपयांवर आले.

तर चांदी ५१५० रुपयांनी उतरून १४९३५० रुपयांवर आले. चांदीचे भाव २५ दिवसांच्या नीचांकीवर आले असून यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर होती. त्यानंतर भाव सतत वाढत गेले होते.मध्यंतरी मोठी भाववाढ झाल्याने भाव स्थिरावण्यासह दलालांनी सोने-चांदीची विक्री अचानक वाढविल्याने भावात घसरण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दिवाळीनंतर दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसून येत असून दिवाळीनंतर आता लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होणार आहे. त्यापूर्वी सोने-चांदीत होत असलेल्या घसरणीमुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now