जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचा ट्रेंड सुरूच आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी देखील सोने दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळ्यामागे किती रूपयांची वाढ झाली आहे, पाहुयात.

काही दिवसांत गौराईंचं आगमान होईल. गौरीसाठी आपण सोनं खरेदी करतो. परंतु सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. आज २८ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट प्रति तोळा सोन्यामागे १६० रूपयांची वाढ झाली आहे. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यामागे १५० रूपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोनं १६० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १,०२,६०० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,६०० रुपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला १०,२६,००० रूपये मोजावे लागतील. ऐन सणावाराला सोनं महागल्यामुळे सामान्यांना याची झळ बसत आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोनं १५० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९४,०५० मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोनं १,५०० रूपयांनी महागले असून, खरेदीसाठी आपल्याला ९,४०,५०० रूपये मोजावे लागतील.












