जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२६ । सातत्याने दर वाढून सर्वसामान्य लोकांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या सोने आणि चांदी दरात सध्या जोरदार घसरण सुरु आहे. काल आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडताच सोने दरात पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. यामुळे सणासुदीसह लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. Gold Silver Rate Today

आता सोन्याचा भाव काय?
आज सकाळी २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे २,९४० रुपयांनी घसरून १,४०,३५० रुपये झाले आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,२८,६५० रुपयांवर आहेत. या दरात २,७०० रुपयांची घसरण झाली आहे सोबतच आज १८ कॅरेटच्या दरात प्रति तोळ्यामागे २,२१० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,०५,२६० रुपये झाले आहेत.

दुसरीकडे आज सकाळी चांदीचा भाव तब्बल ७०१५ रुपयांनी घसरून २,१८,१५३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
दरम्यान, सोने आणि चांदी दरातील घसरणीमागे मध्यपूर्वेत उफाळून आलेला अमेरिका-इराण युद्धजन्य तणाव आता काहीसा निवळताना दिसत असल्याचा हा थेट परिणाम आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेल्या गुंतवणूकदारांनी आता ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी सावध भूमिका घेतल्याने, आज मंगळवारी देशांतर्गत आणि जागतिक बाजारात मौल्यवान धातूंचे दर आपटले आहेत. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.










