जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये पोलिस दलाची प्रतिमा डागाळणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध वाळू तस्करांशी संगनमत करून दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या जळगाव तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला अखेर निलंबित करण्यात आले आहे. रामकृष्ण इंगळे असं निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव असून यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.

वाळू उपशासाठी महिन्याची ठराविक रक्कम (हप्ता)मागतानाचे इंगळे याचे वाळू चोरासोबतचे संभाषण असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यात वाळू चोर खेडी लगत चंदु अण्णा नगरात २ ट्रॅक्टर चालतात. त्यासाठी काय द्यावे लागेल ? अगोदरच्याला ५ हजार रुपये देत असल्याची माहिती देतो. त्यावर हेड कॉन्स्टेबल इंगळे ४ हजार द्या असे सांगतो. इतकेच नाही, तर बिनधास्तपणे काम सुरू ठेवण्याचा सल्लाही दिल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत इंगळे याला निलंबित केले. या घटनेमुळे गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करीमागील ‘अर्थपूर्ण’ साखळी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.दरम्यान, पोलिस दलात ‘कलेक्शन’च्या स्पर्धेमुळेच हा व्हिडिओ बाहेर आल्याची चर्चा रंगली आहे. अंतर्गत वाद, गटबाजी आणि पैशांच्या स्पर्धेमुळेच एकमेकांचे कारनामे उघड होत असल्याचेही बोलले जात आहे.या घटनेमुळे जळगाव पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले






