रोहिणी खडसेंची चाकणकरांवर नाव न घेता जिव्हारी लागणारी टीका; ट्विट करत म्हणाल्या…

मार्च 28, 2026 10:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता थेट राजकारणात उमटताना दिसत आहेत. वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडले आहे.

rupali chakankar rohini khadse 1

दरम्यान अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कुठेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. ‘वैयक्तिक’कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…’ एवढीच त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, अशोक खरातवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. भोंदूगिरीच्या आडून त्याने महिलांचं लैंगिक शोषण चालवलं होतं. महिलांवर तो अत्याचार करायचा. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अशोक खरातला पाठीशी घातल्याचा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहे. अशोक खरातसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही दावा केला जात आहे.

काल रुपाली ठोंबरे पाटील आणि सुष्मा अंधारे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकर यांना अटक करा अशी मागणी केली. रुपाली चाकणकर हे रॅकेट चालवत होत्या का? या प्रश्नावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, ‘जे पुरावे समोर आलेत त्यानुसार रुपाली चाकणकर चालवत आहेत हे प्रथमदर्शनी दिसत आहे’ ‘रुपाली चाकणकर यांची अजूनपर्यंत का चौकशी झाली नाही?’ असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now