ग्राहकांसाठी गुडन्यूज ! आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त, सोनेही घसरले, पहा नवीन दर

ऑगस्ट 2, 2025 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । सणासुदीपूर्वी सोने आणि चांदी दरात दरवाढ होते हे समीकरण ठरलेले आहे. सणासुदीच्या दिवशी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह असतो. आणि ग्राहक थोडे जास्त पैसे गेले तरी काळजी करत नाहीत. तर काही जण बाजाराचा अंदाज घेऊन खरेदी करतात. दरम्यान रक्षाबंधन सण आता काही दिवसांवर येऊ ठेपला असून त्यापूर्वीच सोन-चांदी दरात घसरण होताना दिसत आहे.

gold silver 1 jpg webp

सराफ बाजारात महिन्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. कालच्या तुलनेत आज २ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम सोनं २५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,००० इतका आहे. तर, २२ कॅरेटसोन्याची किंमत ९१,४०० रूपये आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्याही दरात घट झाली असून, आज चांदी ₹१,१२,९०० प्रति किलो दराने विकली जात आहे. चांदीचा दर तब्बल ₹२,००० रुपयांनी घसरला आहे.

रक्षाबंधन सणापूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मागच्या आठ दिवसात जळगाव सराफ बाजारात चांदी दरात तब्बल ५ हजार रुपयांहून अधिकची घसरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्याच्या शनिवारी चांदीचा एक किलोचा दर ११६००० रुपये इतका होता. तर आज १११००० रुपयांवर पोहोचला आहे. तर सोने दरात ५ रुपयांपर्यंतची घसरण दिसून येत आहे. मात्र अद्यापही जीएसटीसह सोन्याचा दर १ लाखाच्यावर आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now