सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 10 दिवसात भाव ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; पाहा आजचे लेटेस्ट दर

ऑगस्ट 19, 2025 1:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली होती. मात्र रक्षाबंधनानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी सध्या चांगली संधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

gold

मागच्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत जवळपास 2500 रुपये प्रति १० ग्रॅमने घसरण झाली आहे. पारंपारिकपणे, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सोन्याची मागणी जास्त असते कारण या काळात गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळीसारखे मोठे सण येतात. रक्षाबंधनापूर्वी शुद्ध सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव १ लाख ४ हजारावर पोहोचला होता. त्यामुळे आगामी सणासुदीत भाव कमी होणार की नाही? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून होते. मात्र मागच्या दहा दिवसात सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

काय आहेत आज सोन्याचा भाव?

आज १९ ऑगस्ट (मंगळवार) रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ४३० रूपयांची घसरण झाली आहे. १ तोळं सोन्याचा दर १,००,७५० इतका आहे. त्याचसोबत २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ४०० रूपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,३५० इतका आहे

चांदीचा भाव?

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आता चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एक ग्रॅम चांदी १ रूपयांनी स्वस्त झाली आहे. तर, १ किलो चांदी १००० रूपयांनी स्वस्त झाली आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,००० इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now