जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोद्यामधील लोकल बँक ऑफिसरच्या एकूण २४८२ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच १८ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ०७ सप्टेंबर, २०२६ पर्यंत आपला अर्ज भरू शकतात. Bank of Baroda LBO Bharti

रिक्त पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देखील उपलब्ध आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना ५ वर्षांची, इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज शुल्क
स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹८५० आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹१७५ आहे.
परीक्षेचा नमुना
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत इंग्रजी, सामान्य आणि आर्थिक जागरूकता, तर्कशास्त्र आणि संख्यात्मक योग्यता या विषयांवर आधारित १२० प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला १२० गुण असतील. परीक्षा १२० मिनिटांसाठी घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण वजा केला जाईल. परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत, भाषा प्राविण्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
पगार: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४८,४८० ते ₹८५,९२० पर्यंत पगार मिळेल.












