Gold Silver : सोन्याचा दर स्थिर, मात्र चांदी दरात मोठी वाढ ; आजचे भाव तपासून घ्या..

ऑगस्ट 18, 2025 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १९०० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. सोने दरात घसरण झाली असली तरी ते १ लाखांपेक्षा जास्त आहे.

gold silver 1

दरम्यान आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर स्थिर दिसून आलाय. कालपेक्षा आज सोन्याच्या दरात कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही. मात्र आज चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. आज चांदी दरात प्रति किलो ८०० रुपयांची वाढ दिसून आली.

आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,०१,१८० रुपये झाला आहे, २२ कॅरेट सोन्याचे भाव ९२,७५० रुपये प्रति तोळा आहे. तर १८ ग्रॅम सोन्याचे दर प्रति तोळा ७५,८९० रुपये आहेत. दुसरीकडे आज चांदी दरात ८०० रुपयाची वाढ होऊन ११७००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now