Gold-Silver Rate : चांदी दरात 1000 रुपयाची वाढ, सोने.. ; वाचा आजचे नवीन दर

ऑगस्ट 14, 2025 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. मागच्या तीन दिवसात सोने दरात घसरण झाली. तथापि, या घसरणीनंतरही, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत अजूनही १ लाख रुपयांच्या वर आहे.पण आज सोन्याचे दर जैसे थे आहे. ना वाढ ना घट, सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. मात्र दुसरीकडे चांदी दरात वाढ झाली आहे.

gold rate 2

आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १,०१,३५० रूपये मोजावे लागतील. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला ९२,९०० रूपये मोजावे लागतील.त्याचसोबत १८ कॅरेट सोन्याच्या दरातही कोणतेच बदल झाले नाही. १८ कॅरेट १० ग्रॅमसाठी आपल्याला ७६,०१० रूपये मोजावे लागतील. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीच्या दरात ११६ रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,००० इतका आहे.

सोन्याची किंमत का घसरत आहे?

जागतिक स्तरावर तणाव कमी झाल्यामुळे, गुंतवणूकदार आता सोन्यापासून दूर जात आहेत. रशिया आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्याची आशा आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील संभाव्य भेटीच्या बातमीने रशिया-युक्रेन संघर्षात शांततेची आशा वाढवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now