आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण ; खरेदीपूर्वी नवीन दर तपासून घ्या

डिसेंबर 13, 2025 1:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२५ । सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरूच असून आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातुंमध्ये घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याला उतरती कळा लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अद्यापही सोने आणि चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.

gold

आज शनिवार १३ डिसेंबर रोजी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २७० रुपयांनी घसरले आहेत. यानंतर २४ कॅरेट १० ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना १,३३,९१० रुपये मोजावे लागणार आहे. सोबतच २२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे. यामध्ये प्रति तोळ्यामागे २५० रुपयांची घसरण होऊन ते १,२२,७५० रुपयावर आले आहे

चांदीचा दर
सोन्यासह चांदी दरातही आज घसरण झाली आहे. चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. काल चांदीचे दर इतिहासात पहिल्यांदाच २ लाखांपेक्षा जास्त होते. आता या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे. चांदीचे दर काल २,०४,००० रुपये होते. हेच दर आज १,९८,००० रुपये झाले आहेत.

सोने आणि चांदी दोन्हीचेही दर घसरल्याने आज दागिने खरेदी करायची योग्य वेळ असल्याचे म्हणायला हरकत नाही. दरम्यान, हे दर कमी झाले असले तरीही अजून १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत. हे दर अजून कमी करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now