ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीत पुन्हा तेजी ; जळगावमध्ये दर गगनाला भिडले, बघा आताचे नवीन भाव?

नोव्हेंबर 30, 2025 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२५ । एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी दिसून आली. दोन्ही धातूंच्या भावात सलग पाचव्या दिवशी भाववाढ होऊन चांदीच्या भावात सात हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख ७४ हजार रुपयांवर पोहोचली. तसेच सोन्याच्या भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपयांवर पोहोचले.

gold silver jpg webp

मध्यंतरी घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात दोन आठवड्यांपासून चढ-उतार सुरू होता. त्यानंतर आता पाच दिवसांपासून तर मोठी भाववाढ सुरू आहे. यामध्ये २५ ते २८ नोव्हेंबर या चार दिवसांत ११ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन एक लाख ६६ हजार ३०० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी (२९ नोव्हेंबर) एकाच दिवसात चांदीच्या भावात थेट सात हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

दुसरीकडे २५ ते २८ नोव्हेंबर या चार दिवसांत तीन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन एक लाख २६ हजार ८०० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २८ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

या वाढीचे मुख्य कारण फेडरल रिझर्वने व्याजदर कमी करणे हे असल्याचे सराफ व्यावसायिक यांनी सांगितले. यामुळे गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. लग्न सराईच्या दिवसांमध्ये ही दरवाढ वऱ्हाडी मंडळींच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात दागिने मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दिवाळीत दर वाढून नंतर घसरले होते, मात्र आता पुन्हा वाढल्याने ग्राहक त्रस्त आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now