जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच असून बुधवारी सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी सोने दरात ८०० रुपयांची तर चांदी दरात एक हजार रुपयापेक्षा अधिकची वाढ झाली. Gold Silver Rate Today
यामुळे आता २२ कॅरेट सोन्याचे दर ७४,६१९ (जीएसटीसह ७६,८५७) रुपये तर २४ कॅरेट सोने ८१,४०० रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटीसह ८३,८४२) वर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदी ९३००० रुपये किलो दरावर स्थिरावले. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सोन्याची किंमत ८०,६०० रुपये तोळा होती. बुधवारी एकाच दिवसात दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. नववर्षात १ जानेवारीपासून आतापर्यंत तोळ्यामागे साडेचार हजारांनी महाग झाले आहे. जळगावच्या सराफा बाजारात १ जानेवारीला शुद्ध सोन्याची किंमत ७६,९०० रुपये (जीएसटीसह ७९,२०७) तोळा होती.
दर वाढीचे कारण?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भूराजकीय तणाव वाढला आहे. तसेच शेअर बाजारातील वाढती अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरात कपात, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी आली आहे.