---Advertisement---
वाणिज्य

नव्या युगातील फीचर्ससह बजाज पल्सर NS125 लाँच ; किंमत जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । बजाज पल्सर ही अशीच एक बाईक आहे जी तरुणांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. जर तुम्हीही बजाज पल्सरची बाईक खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. पल्सर सीरिज बाईक Ns125 (Bajaj Pulsar NS125) चे नवीन एबीएस व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहे. ही बाईक तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली असून दमदार इंजिन आणि स्टायलिश लूक तसेच नव्या युगातील फीचर्स या बाईकला देण्यात आले आहे.

bajaj pulsar ns125

फीचर्स कोणते?
कंपनीने या बाईकमध्ये एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बसवले आहे, जे यापूर्वी पल्सर N160 आणि पल्सर N150 मध्ये देखील बसवले गेले होते. या डिजिटल क्लस्टरमध्ये वास्तविक इंधन वापर, स्पीडोमीटर आणि सरासरी इंधन यासारख्या अनेक मूलभूत आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यासोबतच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील यामध्ये देण्यात आली आहे. यासोबतच मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्टची सुविधाही जोडण्यात आली आहे.

---Advertisement---

इंजिन
बजाज पल्सर NS125 मध्ये १२४.४५ सीसी एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे जे ८,५०० आरपीएम वर १२ बीएचपी पॉवर आणि ७,००० आरपीएम वर ११ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५-स्पीड ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे. कंपनीने ही बाईक चार वेगवेगळ्या रंगांमध्ये लाँच केली आहे.

किंमत
बजाजने त्यांची NS125 तिसऱ्यांदा अपडेट केली आहे. याआधी या बाईकचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध होते. या बाईकच्या बेस मॉडेलची किंमत ९९,५०१ रुपये आहे. त्याच्या मिड व्हेरिएंट NS125 LED BT ची एक्स-शोरूम किंमत १,०४,४७४ रुपये आहे. या बाईकच्या नवीन टॉप-व्हेरिएंट NS125 LED BT ABS ची किंमत १.०७ लाख रुपयांपासून सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---