---Advertisement---
जळगाव जिल्हा

शाळांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; 22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित/ विना अनुदानित/ कायम विना अनुदानित खासगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2024-25 अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगांव जिल्हयातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 से 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

school

अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ट महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना या अंतर्गत पात्र अल्पसंख्यांक शाळांचे प्रस्ताव सादरकरण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2025 आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. याची देखील शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावयाची आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---