---Advertisement---
जळगाव जिल्हा

Jalgaon : नविन दुचाकीसाठी पसंतीचा क्रमांक हवंय? मग ‘या’ पद्धतीने त्वरित करा अर्ज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-१९/ईक्यू ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

number for vehicles

ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयात दिनांक २४ व २५फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज दुपारी ४.०० वाजेपर्यंत जमा करायची आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे, त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक असणार आहे.

---Advertisement---

दिनांक २४ व २५फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दिनांक २५फेब्रुवारी २०२५ रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक २५फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत २७ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

बंद लिफाफे हे २७ फेब्रुवारी रोजी ४.३० वाजता सहाय्यक /उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील असे जळगावचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---