जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात विदयुत वाहन आणि सोलर सिस्टिमकडे सध्याचा कल यावर एक दिवसीय राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन गोदावरी अभियांत्रिकीच्या तंत्रनिकेतनच्या विद्युत विभागा मार्फत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये व्ही .के. खाचणे (निवृत्त अधिक्षक अभियंता) आणि कौशिक वाघुळदे (कुमार इलेक्ट्रिकल,जळगाव) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

त्यांच्यासोबत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,तंत्रनिकेतन समन्वयक प्रा.दीपक झांबरे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. नितीन पाटील, विद्युत विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते व इतर शिक्षक वृन्द उपस्थित होते. सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आली. शिक्षकांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल आणि सोलर सिस्टिम बाबत आणि त्याच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता व्हावी व माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्ही .के. खाचणे यांचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि कौशिक वाघुळदे यांचे तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.व्ही .के. खाचणे यांनी याप्रसंगी इलेक्ट्रिकल व्हेईकल, इलेक्ट्रिकल व्हेईकल चे भाग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, चार्ज कंट्रोलर आणि सध्या बॅटरी चार्जिंग साठी येणार्या समस्या व उपाय या मुद्द्यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात कौशिक वाघुळदे यांनी सोलर सिस्टिम, सोलर पॅनल, चार्ज कंट्रोलर , ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड यातील फरक, सोलर पॅनलची साफसफाई आणि नेट मीटरिंग,या मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
जळगाव विभागातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच परिसरातील सर्व तंत्रनिकेतन च्या माध्यमातून शिक्षक वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते .कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव) डॉ. केतकी पाटील सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रिया इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.