जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२५ । ऐन गणेशोत्सवात ज्याची भीती होती तेच झालं. दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज शनिवारी बाजार उघडताच २४ कॅरेट सोने दरात जीएसटीविना प्रति तोळा १००० रुपयांनी तर चांदीत तब्बल २५०० हजार रुपयांची वाढ झाली. ऐन सणासुदीत सोन्यासह चांदीचे दर वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना धक्का बसला आहे. Gold Silver Rate Today

सोन्याचा दर
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात शुक्रवारी ९०० रुपयांची वाढ होऊन ते जीएसटीविना १ लाख २ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. मात्र आज शनिवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याचा दर १००० रुपयांनी वाढला. यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३ हजार ८०० रुपयावर पोहोचला. तर जीएसटीसह १ लाख ६ हजार ९१४ रुपयांपर्यंत मजल मारली. हा दर जळगाव सुवर्णपेठेतील सर्वात उच्चांकी दर ठरला आहे.

चांदीचा दर
दुसरीकडे या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसात चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आलेली नव्हती. मात्र शुक्रवारी चांदीच्या भावात ८०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १८ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. यांनतर आज शनिवारी सकाळी चांदी दरात प्रति किलो २५०० हजार रुपयांची वाढ होऊन ती जीएसटीविना १,२१,३०० रुपयांहून अधिकने वाढले. तर जीएसटीसह चांदी १ लाख २४ हजार ९४० रुपये ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.
सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना, सोन्यासह चांदीच्या किंमतींनी गाठलेला नवा उच्चांक सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ आणि भारतीय रुपयाची कमकुवतता ही या वाढीमागील मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे.












