⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | ग्राहकांना मोठा दिलासा! सोने प्रतितोळा 500 रुपयांने घसरले, आताचे दर पहा

ग्राहकांना मोठा दिलासा! सोने प्रतितोळा 500 रुपयांने घसरले, आताचे दर पहा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । सोने-चांदीने मोठा दिलासा दिला. सोने दरात नवीन वर्षात २ जानेवारीचा अपवाद वगळता सातत्याने घसरण सुरू आहे. सोमवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात प्रति तोळ्यामागे ५०० रुपये घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर ६३ हजाराच्या खाली आला आहे. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. Gold Silver Rate 9 January 2024

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने विनाजीएसटी ६४ हजारांवर पोहचले होते. चांदीनेही ७७ हजाराचा पल्ला गाठला होता. ऐन लग्नसराईत झालेल्या दरवाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र मागील काही दिवसात दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसून येतेय.

नवीन वर्षात १ तारखेला ६३८०० रुपये तोळा असणारे सोने २ रोजी ३०० रुपयांनी वाढून ६४१५० वर पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्यात ४५० रुपये घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी दर ४०० रुपयांनी घसरले. त्यानंतर दोनशे व शंभर रुपयांची घसरण होत आठवड्याच्या शेवटी ६३२०० रुपये प्रति तोळ्यावर आलेले सोने सोमवारी ५०० रुपयांनी घसरून ६२७०० रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून येत आहे. उच्चांकापासून चांदी तब्बल ४००० ते ४५०० हजार रुपयांनी घसरली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.