गुड न्यूज ! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा नवे दर

जानेवारी 8, 2024 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय. जागतिक बाजारपेठेतील कमकुवत मागणीमुळे दोन्ही धातूंमध्ये घसरण नोंदवण्यात आली. यासोबतच भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीही घसरल्या आहेत. Gold Silver Rate 8 January 2024

gold jpg webp

MCX वर सोन्या-चांदीच्या किमती किती आहेत?
तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 242 रुपयांनी घसरून 62,315 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, तर दुसरीकडे चांदीचा भाव 379 रुपयांच्या घसरणीसह 72,208 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगावमधील दर
जळगावच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये 10 ग्रॅमने विकला जात आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 63,000 रुपये आहे. दुसरीकडे चांदीचा भाव विनाजीएसटी 73,000 रुपये प्रति किलो झाला आहे. दरम्यान, लग्नसराईमुळे पुन्हा एकदा सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असून किमती पुन्हा आस्मान गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now