⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, चांदीही महागली, पहा आजचा भाव

Gold Silver Rate : घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, चांदीही महागली, पहा आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । देशभरात सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून यातच सोन्याच्या (Gold Rate Today) किमतीत पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. उच्चांकी दर गाठलेल्या सोने दरात गेल्या दोन दिवसांपासून १३८० रुपयांची प्रती तोळ्यामागे घसरण झाली. मात्र, गुरुवारी यात पुन्हा झालेली पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) दरात आणखी २०० रुपयांची वाढ झाली. Gold Silver Rate 8 December 2023

सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोमवारी सोन्याच्या दरात वाढ होऊन ते आजपर्यंतच्या उच्चांकी ६६,२२९ रुपये तोळा पातळीवर पोहोचले होते. तर चांदीने आतापर्यंतचा उच्चांकी ८०,३४० रुपये किलो या दराची बरोबरी साधली होती. यामुळे लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.

मात्र, या आठवड्यातील मंगळवार व बुधवारी सोन्याच्या दरात घसरण होऊन सोने ६४,५७५ रुपये तोळे झाले होते. गुरुवारी ही घसरण थांबली. सोन्याच्या दरात अवघी ५० रुपयांची वाढ होत सोने ६४६८२ प्रती तोळा झाले.

चांदीच्या दरात बुधवारी १०३० ने वाढ झाली होती. गुरुवारी आणखी २०० रुपयांची भर पडून चांदीचे प्रती किलोचे दर ७८,४८६ रुपये झाले. दरम्यान, आगामी दोन ते तीन आठवडे चांदीच्या दरात अशाच स्वरूपाने चढ-उतार सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बद्दल बोललो, तर आज सकाळी १० वाजेपर्यंत सोने ३४ रुपयाच्या वाढीसह ६२,५०० रुपयावर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा २६३ रुपयाच्या वाढीसह ४,५७६ रुपयावर ट्रेंड करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.