⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | ग्राहकांसाठी आनंदवार्ता ; अक्षय्य तृतीयापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण

ग्राहकांसाठी आनंदवार्ता ; अक्षय्य तृतीयापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२४ । मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली होती. गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील सोन्याचे दर तेजीतच होते. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही धातूंच्या दरात घसरण सुरू झाल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी प्रती तोळा ७४ हजार २०० रुपये असलेले सोने ७ मे रोजी ७१ हजार ५०० रुपयापर्यंत खाली घसरले.

जळगाव सराफा बाजारात २२ कॅरेट सोने प्रती तोळा ६५ हजार ९५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१५००-७०० पर्यंत आहे. दुसरीकडे चांदी ८२ हजार रुपये किलो असे दर आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही

फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रती तोळा ६२ हजार ९०० रुपये भाव होते. ३१ मार्च २०२४ रोजी ६८ हजार ७०० तर २३ एप्रिल रोजी ७४ हजार २०० रुपये असा भाव होता. २३ एप्रिलनंतर अवघ्या १५ दिवसांत सोन्याच्या प्रती तोळा भावात ३४०० ते ३६०० रुपयांची घसरण दिसून आली

तीन दिवसावर अक्षय्य तृतिया..
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया या सणाकडे पाहिले जाते. सोने खरेदी, विवाह, गृहप्रवेश, नवीन वस्तू खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.