दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा ! सोन्याचा दर पुन्हा घसरला, पहा आजचा दर?

एप्रिल 7, 2023 12:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२३ । सोन्याच्या किमतीने बुधवारी जबरदस्त उसळी घेत विक्रमी उच्चांक गाठला. या दिवशी सोन्याने ६१,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा भाव ओलांडला होता. मात्र, आता त्या दिवसापासून त्यात घट दिसून येत आहे. काल गुरुवारनंतर शुक्रवारीही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आणि तो ६१,००० च्या खाली गेला. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

जळगाव सुवर्ण नगरीत आज सकाळी २४ कॅरेट एक तोळा सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचा भाव ६०,६०० रुपये (विना जीएसटी) प्रति दहा ग्रॅम झाला. यापूर्वी बुधवारी सकाळी सोन्याचा दर ६१,१०० रुपये (विना जीएसटी) इतका होता. म्हणजेच दोन दिवसात सोनं ५०० रुपयांनी घसरले आहे.

तर दुसरीकडे चांदीचा दर सलग दुसऱ्या दिवशी स्थिर असलेला दिसून आला. आज चांदीचा प्रति किलोचा दर ७४,५०० रुपये (विना जीएसटी) इतका आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी चांदीचा दर ७५००० रुपायांवर होता. त्यात आतापर्यंत ५०० रुपयाची घसरण झालेली आहे.

दरम्यान, यंदाच्या दिवाळीत दोन्ही मौल्यवान धातू वेगाचा नवा विक्रम निर्माण करतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा भाव
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये घसरण दिसून आली.आज शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोन्याचा भाव 341 रुपयांनी घसरून 60515 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव अवघ्या 1 रुपयांनी घसरून 74554 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now