Gold-Silver : सोने चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच, काय आहे आजचा भाव?

एप्रिल 6, 2022 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । सोने चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. कालच्या दरवाढीनंतर आज सोने स्वस्त झाले आहे.सोबतच चांदीही घसरली आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात १६० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात १०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने १९० रुपयाने महागले होते तर चांदी ४५० रुपयाने स्वस्त झाली होती.

gold rate (2)

आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज बुधवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५८० रुपये इतका आहे. तर चांदी ६७,७५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. युद्धादरम्यान, सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. मागील तीन आठवड्यात सोन्याचा भाव १४०० ते १५०० रुपयांनी कमी झाला आहे. तर याच कालावधीत चांदी ३००० ते ३२०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,०९० रुपये होते. तर २९ मार्च रोजी ५२,७८०, ३० मार्च रोजी ५२,०००, तर ३१ मार्च ५२,१५०, १ एप्रिल ५२,७९० प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे २८ मार्च ला चांदी ७०,४५० प्रति किलो होती. २९ मार्च ६९,७००, ३० मार्च ६८,५२०, तर ३१ मार्च ला ६८,९९०, तर १ एप्रिल ला ६९,०७० रुपये प्रति किलो इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now