जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । यावर्षात, जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल या तीन महिन्यात सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारत नवीन रेकॉर्ड तोडले होते. पण मध्यंतरीच्या काळात एका विशिष्ट किंमतीतच चढउतार सुरु होता. या दरम्यान दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आला नाही. पण नवनवीन रेकॉर्ड करणारे सोने आता थेट जमिनीवर आले आहे. दोन्ही धातूंनी घसरणीचा नवीन रेकॉर्ड तयार केला. Gold Silver Rate Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरूतीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून आली. घसरणीनंतर आता सोन्याचा भाव 66 हजारावर आला आहे. बऱ्याच काळानंतर सोन्याच्या दरात अशी घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, MCX वर 9.30 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 54 रुपयाची घसरण झाली असून यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 56,225 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत 405 रुपयांची घसरण होऊन 66,990 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
जळगावमधील दर?
जळगाव सुवर्णनगरीत मागील गेल्या आठ दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 1700 रुपयाची घसरण झाली आहे. गेल्या बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 59400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तो आजच्या सकाळच्या सत्रात विनाजीएसटी 57,700 रुपये प्रति तोळ्याने विकला जात आहे.
दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या बुधवारी चांदीचा प्रति किलोचा दर 72,000 रुपयांवर होता. तो आज सकाळच्या सत्रात विनाजीएसटी 68,500 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. म्हणजेच गेल्या आठ दिवसात चांदीच्या किमतीत 3500 रुपयाची घसरण झाली आहे.