आठवड्याभरात सोने इतक्या रुपयांनी वाढले ; पहा जळगावातील आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव..

फेब्रुवारी 4, 2024 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 4 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. जानेवारीच्या अखेर आणि फेब्रुवारीच्या सुरुवातील ग्राहकांच्या खिशावर भार पडला. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून 63 हजार रुपायाखाली आला होता. मात्र या आठवड्यात सोन्याचा भाव वधारला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात काही बदल झालेला नाहीय. Gold Silver Rate 4 February 2024

gold silver jpg webp

दरम्यान, काल सोन्याच्या दरात 300 रुपयांपर्यंत घसरण झाली तर दुसरीकडे चांदीच्या दर 500 रुपयांनी घसरला आहे. या आठवडाचे बोलायचं झाल्यास आठवड्याभरात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. सध्या जळगाव सुवर्णनगरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,400 इतका आहे. यापूर्वी सोमवारी (29 जानेवारी) सोन्याचा दर 62,900 इतका होता.

त्यानंतर मंगळवारी सकाळी 100 रुपयाची वाढ होऊन 63000 रुपयांवर गेला. बुधवारी सकाळी त्यात 300 रुपयाची वाढ होऊन 63,300 रुपयांवर पोहोचला, गुरुवारी पुन्हा 100 रुपयाची वाढ होऊन 63,400 झाला, शुक्रवारी 100 रुपयाची घसरण झाल्याने दर 63,300 रुपयांवर आला. मात्र शनिवारी सकाळी दरात पुन्हा 400 रुपयांची वाढ दिसून आली. यामुळे सोन्याचा दर 63,700 रुपयांवर विकला जात होता. मात्र त्यात पुन्हा 300 रुपयापर्यंतची घसरण झाली.

दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आला. सोमवारी (29 जानेवारी) चांदीचा दर 72,500 रुपये प्रति किलो इतका होता. आज रविवारी सकाळी चांदीचा दर विनाजीएसटी 72,500 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. मध्यंतरी चांदीचा 73000 रुपयावर स्थिर होता. मात्र आज त्यात 500 रुपयाची घसरण दिसून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now