⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोने पुन्हा महागले; काय आहे महाराष्ट्रात १० ग्रॅमचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून आला. मंदीच्या भीतीने सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जात असून गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला. यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमती 47,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदीचा आजचा भाव 58,000 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. चांदीची घसरण थांबली असून गेल्या दोन दिवसात चांदीचे भाव (Silver Price Today) वधरल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात घसरण आणि तेजी दिसून आली होती. Gold Silver Price Today

देशांतर्गत बाजारातही भाव वाढले
परदेशी बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही(Indian Market) दिसून येत आहे. कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याची किंमत 51700 रुपयांच्या जवळ आहे, गेल्या आठवड्यात MCX वर किंमत 49703 रुपये प्रति 10 ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचली होती आणि तिथून किंमत सुमारे 2000 रुपयांनी वाढली आहे. जगभरात आर्थिक आव्हाने वाढली की सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढते. त्यामुळेच मंदीच्या भीतीने सोन्याच्या दरात मोठी झेप घेतली आहे.

महाराष्ट्रातील बड्या शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,200 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,490 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 580 रुपये आहे. काल हा दर 565 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.