⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ ; खरेदीपूर्वी तपासून घ्या आजचा नवीन भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे. ६० हजारांवर गेलेला सोन्याचा दर काहीसा घसरलेला दिसून येतोय. दुसरीकडे चांदीचा दर ७० हजारावर आहे. मात्र येत्या काळात सोने ६५,००० रुपयांचा विक्रम करू शकतो, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही ८०,००० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

जळगाव सुर्वण नगरीतील भाव?
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जळगाव सुर्वण नगरीत आज सोमवारी सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,४०० रुपये इतका आहे.दरम्यान, गेल्या आठवडयात सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून आलीय. गुडीपाडव्याच्या दिवशी सकाळी सोन्याचा भाव ५९ हजाराखाली होती. मात्र त्यानंतर सोन्याचा दर ६० हजारांवर गेला होता. यापूर्वी गेल्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव ५५,००० रुपयांच्या आसपास होता.त्यात आतापर्यंत तब्बल ४५०० ते ५००० हजार रुपयाची जोरदार वाढ झालेली दिसून येतेय.

आजचा चांदीचा दर
आज चांदीचा एक किलोचा दर ७०,००० रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसात चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झालेली दिसून येतेय. गेल्या १५ दिवसापूर्वी चांदीचा दर ६४ हजारावर होता. मात्र त्यात आतापर्यंत ६ हजार रुपयांहून अधिकची वाढ झालेली दिसून येतेय.

फेब्रुवारीमध्ये इतका होता दर
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव ५५,००० रुपयांच्या आसपास खाली आला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही ७१००० रुपयांवरून घसरून ६२ हजाराच्या घरात पोहोचला होता. पण त्यात पुन्हा जबरदस्त उडी मारली गेली आणि आता थोडी नरमाई येत आहे. जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे. दिवाळीत सोने-चांदी नवा विक्रम करू शकतात, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.