स्वस्त सोने-चांदी खरेदीची संधी.. किमतीत झाली मोठी घसरण, तपासून घ्या नवे दर?

मे 26, 2023 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरू असून सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात कालच्या किमतीपेक्षा आज मोठा बदल झालेला दिसतोय.

gold silver 2 jpg webp

जळगाव सराफ बाजारातील दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा 56,600 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोने 60,700 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 60,700 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. त्यात तब्बल 1000 रुपयाची मोठी घसरण झालेली दिसून येत आहे.

तर चांदीचा दरही घसरला आहे. कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा प्रति किलोचा दर 72,150 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तो सध्या 71000 हजारावर (विनाजीएसटी) आला आहे. म्हणजेच त्यात 1150 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.

आजचा मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरचा दर ?
आज शुक्रवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर किंचित 55 रुपयांनी वाढला असून सोने 59,515 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 239 रुपयाची वाढ झाल्याने चांदीचा एक किलोचा दर 70,481 रुपयावर व्यवहार करत आहे.

सोने 65,000 तर चांदी 80000 रुपयावर जाणार?
तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर बाजारभावानुसार हा काळ उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात चढ-उतार सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच चांदीचा भावही 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now