⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

खरेदीची सुवर्णसंधी.. सोने-चांदीच्या किमती घसरल्या, पहा काय आहे प्रति तोळा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । मागील काही दिवसापासून सोन्याचे (Gold Rate) दर वाढताना दिसून आले. मात्र आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३५० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) देखील स्वस्त झाली आहे. आज चांदीत ४५० रुपयांची घट झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने २६० तर चांदी ६९० रुपयांनी महागले होते.

जळगावातील आजचा सोने चांदीचा भाव? Gold Silver Rate Today
गुरुवारी सोने प्रतीताेळा ५२,०१० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,९८० रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

कोरोना महामारीनंतर आता जगासमोर मंकीपॉक्स विषाणूने संकट उभं केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉटिडी बाजारात सोन्यासह चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आले. गेल्या तीन दिवसात सोने प्रति तोळा ६३० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे चांदी देखील महागली होती. तीन दिवसात चांदी ४२० रुपयाने महागली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत गेलेला सोन्याचा दर गेल्या आठवड्यात ५१ हजारांवर आला होता.तर मार्च महिन्यात ७२ हजारांवर असलेला चांदीचा भाव गेल्या काही दिवसापूर्वी ६० हजारांवर आले होते. मात्र आंतराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदी पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६०प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.